(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidya Chavhan On Chhagan Bhujbal And Sharad Pawar Meet : छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या अर्धा तास चर्चा; चव्हाण यांची प्रतिक्रिया
Vidya Chavhan On Chhagan Bhujbal And Sharad Pawar Meet : छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या अर्धा तास चर्चा; चव्हाण यांची प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : दीड तासांनी अवघी 15 मिनिटे भेट अन् छगन भुजबळांनी विषय काढताच शरद पवारांचा पहिला प्रतिप्रश्न! भुजबळांनी काय उत्तर दिलं?
मुंबई : बारामतीमध्ये अवघ्या काही तासांपूर्वी केलेल्या जनसन्मान रॅलीमधील घणाघाती टिकेनंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (15 जुलै) थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ ओबीसी मुद्द्यांवरून नाराज असल्याची चर्चा असताना भुजबळ आणि पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आले.
आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास भुजबळ शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. मात्र तब्बल दीड तासानंतर या दोन नेत्यांमध्ये 15 मिनिटे भेट झाली. अवघ्या पंधरा मिनिटांच्या भेटीत काय घडलं? याची माहिती भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत दिली. भुजबळ म्हणाले की, ही कोणतीही राजकीय भेट नव्हती. यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढू नका. ओबीसी मुद्यावर मार्ग कसा काढायचा याबाबत चर्चा केल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी सांगितले की, राज्यामध्ये ओबीसी आरक्षण देण्याचं काम पवारांनी केलं. आता आरक्षणावर राज्यात काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. त्या संदर्भात मी त्यांना आठवण करून दिली आणि त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यावेळी जो पुढाकार घेतला होता या संदर्भाने सुद्धा त्यांना आठवण करून दिली.