Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 : ABP Majha
Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 : ABP Majha
हेही वाचा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या परिसरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या परिसरात आंबेडकरी जनतेकडून आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे या भागात अंडरग्राऊंड पार्किंग उभारण्याचे काम केले जात आहे. याच पार्किंगच्या कामाला आंबेडकरी जनतेने विरोध केला आहे. आंदोलक या मागणीला घेऊन आक्रमक झाले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत. याच प्रकरणावर आंबेडकर चळवळीत काम करणारे तथा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पार्किंगमुळे दीक्षाभूमी (Dikshabhumi) वास्तूला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबवले पाहिजे, अशी भूमिका आनंदराज आंबेडकर यांनी घेतली.
आनंदराज आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
"दीक्षाभूमी परिसरात शुभोभिकरण चालू आहे, त्यात काहीही दुमत नाही. पण या परिसरात अंडरग्राऊंड पार्किंग असू नये. कारण दीक्षाभूमी परिसरात वर्षातून दोन ते तीन दिवस येथे येतो. या पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या वास्तूला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे काम थांबवावं असं लोकांचं मत आहे. त्याऐवजी या भागात यात्रीनिवास बांधावे. वर्षातून दोन ते तीन दिवस या भागात आंबेडकरी समाज येथे येतो, तेव्हा त्यांना या यात्रानिवासात राहण्याची सोय होईल. नागपूर अधिवेशन चालू असते तेव्हादेखील या यात्रीनिवासाचा उपयोग होईल, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.