Maharashtra : महाविकास आघाडीचे नेते अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार : ABP Majha
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण अधिवेशनाच्या उरलेल्या दोन दिवसांत निवडणूक घेण्याचा सत्ताधारी आघाडीचा प्रयत्न असला तरी राज्यपाल त्याला मान्यता देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काल आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेऊ असं राज्यपालांनी सांगितल्यानं निवडणूक होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यातच काँग्रेसचा उमेदवार कोण हेदेखिल अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे भाजप निवडणूक लढवणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेऊन त्याबदल्यात बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशीही चर्चा सुरु आहे.




















