Vidhan Sabha Election Maharashtra : लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभा रणनीती
लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) जागावाटप (Seat Sharing) करताना महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये चांगलीच राजी-नाराजी पाहायला मिळाली आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजप (BJP) मोठा भाऊ ठरला असून अजित पवारांचा राष्ट्रवादी धाकटा भाऊ असल्याचे दिसून आले. कारण, महायुतीच्या जागावाटपात भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढवली. तर, शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या असून अजित पवारांना केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. मात्र आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा गाजायला लागला आहे. मात्र या संदर्भात मोठी अपडेट एबीपी माझाच्या हाती लागली आहे. लोकसभेचा स्ट्राईक रेटच ठरवणार महायुतीचे विधानसभेचे जागावाटप (Vidhan Sabha) ठरणार असल्याची मााहिती उच्चपदस्थ सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे महायुतीत कुणाला किती जागा सोडायच्या हे राज्यातील लोकसभा निकालावर ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप कसे असणार यावर चर्चांना उधाण आले आहे. आता लोकसभेच्या निकालाच्या स्ट्राइक रेटवरच महायुतीचे जागावाटप निश्चित होईल अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रानी एबीपी माझाला दिली. लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट चांगला असेल त्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप हे लोकसभा निवडणुकीच्या स्ट्राइक रेटवर अवलंबून असणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जिंकून येणे हा एकमेव निकष डोळ्यासमोर असल्यानेच लोकसभा निकालाच्या स्ट्राईक रेटवर विधानसभेच्या जागा निश्चित होतील अशी माहिती मिळत आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/8c8bb3f9f6f35c2a953e16f5c2962c481739802110139977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/d2b8b43687852013e4d7e27e646854851739797700076977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/36b0c9579a75ba25f7c8402907adaf1f1739796913808977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/bdc6360037c8ee0d676570679d6fb9461739792233292977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/9dfb8959e9652324905d7af388a2658c1739791832407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)