Vanchit On Vidhan Sabha | वंचित बहुजन आघाडी सोलापुरातील सर्व जागा लढवणार
Vanchit On Vidhan Sabha | वंचित बहुजन आघाडी सोलापुरातील सर्व जागा लढवणार
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सोलापुरातील सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. पक्षाचे निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा जगासाठीवंचित बहुजन आघाडी उमेदवारी देण्याची तयारी करतं आहे. या 11 जगासाठी जवळपास 48 उमेदवारांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. या सर्वांचे अहवाल तयार करून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केले जातील. त्यानंतर पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी दिली.





















