Unesco World Heritage List 2024-25: शिवरायांच्या गडकिल्ल्यांची यादी युनेस्कोकडे सादर
Unesco World Heritage List 2024-25: शिवरायांच्या गडकिल्ल्यांची यादी युनेस्कोकडे सादर
Unesco World Heritage List 2024-25: नवी दिल्ली : युनेस्को वर्ल्ड हेरिटेज (Unesco World Heritage List) साईटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देश नामांकनं पाठवत असतो. यंदा भारताकडून (India) युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024-25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिलं आहे. यामध्ये किल्ले रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग (Sindhudurg), अलिबाग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे.






















