(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ulhas River River Update : उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ ; नदीकाठच्या भागात पाणी भरण्याचा धोका
Ulhas River River Update : उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ ; नदीकाठच्या भागात पाणी भरण्याचा धोका
मुंबई : महाराष्ट्राच्या बहुतांश (Maharashtra Rain) भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि रायगड (Mumbai Rain Update) या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट दिला आहे. मुंबईभोवती पाणीच पाणी साचले आहे. मिठी, उल्हास नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने, मुंबई महानगराला उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याण स्टेशनजवळ असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कपोते वाहन तळासमोर गुडघाभर पाणी साचलंय. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं योगी धाममध्ये लाखो रुपये खर्च करून सिटी पार्क उभारण्यात आलाय. या पार्कच्या बाजूलाच वालधुनी नदी आहे . गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिटी पार्क जलमय झालाय.
मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर परिणाम
मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर परिणाम, मध्य रेल्वे 20 ते 25, हार्बर 15 ते 20 तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिराने सुरू आहे. मुंबईत सर्व मार्गावरील लोकल सुरू मात्र उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने तर धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने आहेत. तसेच पश्चिम रेल्वेच्या लोकल 10 मिनिटे उशिराने धावत आहेत जोरदार पाऊस असल्याने गाड्यांचा वेग मंदावला असून कर्जत कसारा इथून येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस जास्त उशिराने आहेत.