एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'दुसऱ्याचं घर रस्त्यावर आणून किती मजा मारणार?', उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. 'दुसऱ्याचं घर रस्त्यावर आणून त्याचे लेकरं बाळं उपाशी मारून तू किती मजा मारणार आहेस?' असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील दीड लाखाची कर्जमाफी ऑनलाइन प्रक्रियेत अडकल्याचा आरोप करताना, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोरोना असूनही शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले आणि ते थेट खात्यात जमा झाले, असा दावा ठाकरे यांनी केला. तसेच, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदतही जाहीर केली होती, मात्र सरकार बदलल्यामुळे त्यात अडथळे आल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















