Udayan Raje vs Shivendra Raje : उदयनराजे य़ांची दमदाटी, शिवेंद्रराजे यांचा पलटवार Satara ABP Majha
साताऱ्यातले राजकारण नेहमी चर्चेत असते ते उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमुळे. दोन्ही राजेंमधील राजकीय वैर साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. दोन्ही राजे आता भाजपमध्ये आल्यावर किमान आतातरी हे संपेल असे सर्वांना वाटत होते, मात्र अजूनही एकमेकांना टोमणे मारायला राजे विसरत नाहीयेत. आता पुन्हा हा वाद पेटला आहे. साताऱ्यातील पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनी आमदार शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांनी केला आहे. कामगारांवर अन्याय करणाऱ्या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देवून चिरडलं पाहिजे असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना उद्देशून केलं होतं. या नंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेवून उदयनराजेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन असा टोला लगावला आहे. उदयनराजेंची दमदाटी आणि खंडणीमुळे एमआयडीसीची वाढ खुंटली असा पलटवार शिवेंद्रराजेंनी लगावलाय.