Uday Samant PC: दावोसला शिष्टमंडळ स्वत:च्या खर्चानं गेलंय,उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
Uday Samant PC: दावोसला शिष्टमंडळ स्वत:च्या खर्चानं गेलंय,उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या दोवोस दौऱ्य़ावरुन आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसला जवळजवळ 50 लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. आधी 50 खोके होते आता हे 50 लोकं घेऊन जात आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केलीये... आदित्य ठाकरेंच्या टिकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.. महाराष्ट्राला एक एक रुपयांचा हिशोब दिला जाईल, असं उदय सामंत म्हणालेत... दावोसला जे शिष्टमंडळ गेलंय ते स्वत:च्या खर्चानं गेलं आहे. सध्या अनेक आरोप केले जातायत, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा ऐतिहासिक दौरा ठरणार असल्याचं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं.























