राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीचा मार्ग मोकळा, मंत्री उदय सामंत यांची ट्विटरवरून माहिती
राज्यात प्राध्यापक भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात २०८८ प्राध्यापक आणि प्राचार्यांची भरती करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलीय. त्यामुळे रिक्त पदं भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय. राज्यात २०१३ पासून नियमितपणे प्राध्यापक भरती झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालयात प्राध्यापकांच्या ४० ते ५० टक्के जागा रिक्त आहेत. प्राध्यापकांची भरती व्हावी म्हणून नेट-सेट उत्तीर्ण आणि पीएच.डी पदवी मिळवलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी पाठपुरावा केला. पाच वर्षांपूर्वी सरकारनं ४० टक्के भरती करण्यास मान्यता दिली होती, पण कार्यवाही केली नाही. आता भरती प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.





















