Top 80 News : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News
Top 80 News : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha
माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला.. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य, दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण
विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सामनातून भाष्य, शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंही जन्म झाल्याची आठवण
हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध, निर्णय घेताना विचारात न घेतल्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जीआर रद्द करण्याची मागणी
हिंदी भाषा सक्तीच्या वादात आता संस्कृत भाषेची एन्ट्री, मराठी शाळेत संस्कृत भाषा बंधनकारक करावी, काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांची मागणी
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलीस करणार डॉ. सुश्रुत घैसास यांची चौकशी, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
बुलढाण्यातील नखं गळतीची केंद्र सरकारकडून दखल, तपासणीसाठी पथक नियुक्त, आज केस आणि नखं गळती झालेल्या गावांचा दौरा करणार























