TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27 May 2024 : ABP Majha
TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27 May 2024 : ABP Majha
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक, सुनिल तटकरे, अजित पवार, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार.
धीरज शर्मा आज राष्ट्रवादी अजित पवार गटात करणार प्रवेश, राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीला धीरज शर्माही राहणार उपस्थित, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का,
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचा राजीनामा, पक्ष नेतृत्वाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे वेगळा निर्णय, शर्मा यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची माहिती.
आज दहावीचा निकाल जाहीर होणार, दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार.
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'रेमल' चक्रीवादळ धडकलं, बंगालच्या उपसागारात तयार झालेल्या रेमल महाचक्रीवादळाचा वेग १३० किमीपेक्षा पुढे, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळून वादळ आज बांगलादेशकडे जाणार.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘रेमाल’ बाबत भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी, पश्चिम बंगालसह ओडीशामध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात.