(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 31 July 2024 : ABP Majha
अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसे सैनिक नाराज. अकोल्यात मनसे सैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची केली तोडफोड.
हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड झाल्यानंतर अमोल मिटकरींना उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे फोन. दोषींवर कडक कारवाई करण्याचे अजित पवारांचे अकोला पोलिसांना आदेश.
हल्ला आणि गाडीवर तोडफोड प्रकरणी आठ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी दाखल केले गुन्हे. सर्व मनसे कार्यकर्ते फरार
मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यांना भीक घालत नाही, गाडी तोडफोडीवर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं नाव घेतात आणि गुंडागर्दी करतात. हा भेकड हल्ला आहे. याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार. मिटकरी यांची प्रतिक्रिया.
मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरून हल्ला केला, हल्ल्यानंतर आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर आरोप.
मिटकरींच्या गाडीवरील हल्लाप्रकरणातील आरोपी जय मालोकार यांचा मृत्यू, जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने अकोल्यातल्या रुग्णालयात केलेलं दाखल.