TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 ऑगस्ट 2024 : ABP Majha
५७ किलो फ्रीस्टाईल कुस्तीत अमन सेहरावतला कांस्यपदक. भारताच्या अमन सेहरावतची प्युर्तो रिकोच्या डॅरियन क्रूजवर १३-५ ने मात.
विनेश फोगटने केलेल्या अपीलवर CASमध्ये सुनावणी पूर्ण, भारताकडून हरिश साळवे यांनी मांडली बाजू, आज निकाल येण्याची शक्यता
ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेत्या मनू भाकरने संसद भवनात घेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट. राहुल गांधींनी केले मनूचे अभिनंदन.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती आज ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार. यावेळी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज तिसरा दिवस. आज अजित पवारांचा नाशिक आणि नगर जिल्ह्याचा दौरा.
शरदचंद्र पवार पक्षाची शिवसंग्राम यात्रा आज शिरुरमध्ये, यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे राहणार उपस्थित
काँग्रेसची विधानसभा निवडणूक तयारी लातूरपासून, पहिली विभागीय आढावा बैठक आज होणार, यावेळी मराठवाडयातील पक्षाच्या तिन्ही विजयी खासदारांचा जाहीर सत्कार केला जाणार.
मनोज जरांगेंची शांतता रॅली आज साताऱ्यात. पोवईनाका येथून शांतता रॅलीला सुरवात करणार. गांधी मैदानावर जरांगेंची सभा होणार.