(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला. या प्रकरणाशी निगडित आतापर्यंत सहा आरोपींची नावे समोर आली आहेत. यापैकी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. सलमान खानला मदत करणाऱ्या प्रत्येकाला हिशोब द्यावा लागेल, अशा आशयाची पोस्ट या टोळीशी संबंधित असलेल्या एका आरोपीच्या फेसबुकर पोस्ट करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने मी अल्पवयीन असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट (Ossification Test) करण्याचा आदेश दिला. याच पार्श्वभूमीवर ऑसिफिकेशन टेस्ट काय असते? हे जाणून घेऊ या.. आरोपीने नेमका काय दावा केला होता? बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण तिघांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी यापैकी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील तिसरा आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने गुरनैल सिंह या 23 वर्षीय आरोपीला न्यायालयाने 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर धर्मराज कश्यप (Dharmraj kashyap) या आरोपीने मी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. माझ्या अशिलाचे वय हे 17 वर्षे आहे. त्यामुळे त्याला अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरण्यात यावं, असा दावा कश्यपच्या वकिलांनी केला होता. या दाव्यानंतर न्यायालयाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश दिले होते. या टेस्टनंतर धर्मराजचे वय समजण्यास मदत होणार होती.