TOP 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 2 जून 2022 : ABP Majha
TOP 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 2 जून 2022 : ABP Majha
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत (Mahayuti) भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी (NCP Ajit Pawar Group Candidate List) आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या यादीत 32 ते 35 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत 17 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.
राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजित पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप केले जात असून भरत गावित आणि हिरामण खोसकर यांच्यासह 15 जणांना अर्ज मिळाले आहेत.