(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhaji Raje Chhatrapati : पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडलं, संभाजीराजेंनी जागेवरच सोडवून घेतलं
Sambhaji Raje Chhatrapati : पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडलं, संभाजीराजेंनी जागेवरच सोडवून घेतलं
काहीही झालं तरी अरबी समुद्रात शिवस्मारकाची पाहणी करण्यासाठी जाणारच छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका... सरकारकडून दडपशाही सुरू आहे... अरबी समुद्रात शिवस्मारकाला परवानग्या मिळत नाही तर नरेंद्र मोदींना भूमिपूजनासाठी कशाला बोलावलं ? आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे... आमचा नवीन आणि छोटा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होतो आहे. ही लोकशाही आहे त्यामुळे आम्ही तिकडे जाणारच... छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने आज शिवस्मारक शोधमोहीम पुकारण्यात आली आहे. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचे जलपूजन केले होते, मात्र ८ वर्षे झाले तरी कोणतेही काम झालेले नाही. प्रत्यक्षात कामही सुरु झालेले नाही, मात्र शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. याचा जाब विचारण्यासाठी छत्रपती संभाजी राजे अक्रमक झाले असून आज थेट हजारो मावळ्यांना घेऊन ते अरबी समुद्रात जाणार आहे. संभाजीराजे पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना..