जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांचं ठाणे पालिकेविरोधात आंदोलन,मनसेच्या अविनाश जाधवांचाही सहभाग
ठाण्यात चक्क राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी यांच्यासह ठाणे महानगरपालिकेच्या कोविड 19 संदर्भातील भोंगळ कारभारा विरोधात ठाणे महानगरपालिकेतच ठिय्या आंदोलन केले. आश्चर्य म्हणजे या आंदोलनात मनसे देखील सहभागी झाली. जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव स्वतः ठिय्या देऊन राष्ट्रवादी सोबत बसले. कोविड 19 ची परिस्थिती गंभीर असूनही महापालिका याबाबत अजिबात गंभीर नाही. ठाणे महानगरपालिकेकडे रुग्णांकरता बेड नाहीयेत, ॲाक्सिजन नाहीये, रेमडेसिवर इंजेक्शन नाहीयेत नेमकं ठाणे महानगरपालिकेचे सुरु आहे तरी काय? असा जाब ऋता आव्हाड यांनी महापालिकेच्या अधिका-यांना विचारला.


















