ABP Majha Headlines : 07 PM : 20 April 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 PM : 20 April 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भोंगेविरोधी आंदोलनात १७,००० मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल, २०१७ मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप
महाराष्ट्र द्रोह्यांसह पंक्तीला बसणारेही महाराष्ट्रद्रोहीच, संजय राऊतांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी
दीनानाथ रुग्णालय़ाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल, सूर्या, मणिपाल, इंदिरा आयव्हीएफ रूग्णालयंही पोलिसांच्या रडारवर
मनसेच्या संदिप देशपांडेंच सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, मराठ्यांचे मागील २०० वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल, राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती.
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबारला सुरूवात...समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी...समस्येचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार...
अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही, समीर भुजबळांचा दावा...तर समीर भुजबळ अजितदादांकडून हुसकलेला माणूस, सुहास कांदेंनी डिवचलं..
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संग्राम थोपटे २२ एप्रिलला भाजपात प्रवेश करणार...तीन टर्म निवडून येऊनही पक्षात योग्य संधी न मिळाल्यानं पक्षाला रामराम केल्याचं स्पष्ट..
रामनवमीच्या रॅलीआधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा राडा.....वडाळ्यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप
सोलापूरचे न्यूरोफिजिशिअन डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्याच रूग्णालयातील कर्मचारी महिलेला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी, सुसाईड नोटमधील नोंदीनुसार कारवाई
अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा उघड...नळाला महिन्यातून एकदाच पाणी येत असल्यानं पाणी विकत घेण्याची वेळ...पाणी चोरीला जावू नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप..
जम्मू काश्मीरमधील विविध भागांत ढगफुटीसदृश पाऊस... आतापर्यंत तिघांचा मृत्यू...रामबन शहर उद्धवस्त तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद...
वानखेडेवर आज पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जची लढत, होमपीचवर खेळण्याचा मुंबई इंडियन्सला फायदा, तर आरबीसी विरूद्ध पंजाब सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांना करावी लागणार शिकस्त
मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा...
स्थळ, स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजीसह जुनं फर्निचर चित्रपटाची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड...सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची घोषणा...





















