एक्स्प्लोर
Pak-Afghan Clash: '...तर पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊ'; Taliban चा इशारा Special Report
पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) तालिबानी सैन्यात ड्युरंड सीमेवर (Durand Line) संघर्ष पेटला आहे. पाकिस्तानने ९ ऑक्टोबर रोजी काबूल (Kabul), खोस्त (Khost) आणि जलालाबाद (Jalalabad) येथे केलेल्या एअर स्ट्राईकला (Airstrike) प्रत्युत्तर म्हणून तालिबानने पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केला. 'आमची कारवाई मध्यरात्री संपली, पण पाकिस्तानी सैन्याने पुन्हा अफगाण सीमा ओलांडली तर आमचं सैन्य देशाच्या रक्षणासाठी पूर्णपणे सज्ज आहे,' असा थेट इशारा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. शनिवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचे १२ सैनिक ठार झाले असून तालिबानने दोन लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. एका बाजूला भारतासोबतचा तणाव, तर दुसरीकडे बलुचिस्तानमधील (Balochistan) अंतर्गत बंडखोरी आणि आता तालिबानच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानवरचा दबाव वाढला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















