Swapnil Kusale At Pune : दगडूशेठ मंदिरात स्वप्नील कुसाळेने केली गणेशाची आरती
Swapnil Kusale At Pune : दगडूशेठ मंदिरात स्वप्नील कुसाळेने केली गणेशाची आरती
भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) काल झालेल्या सामन्यात इतिहास रचला आहे. स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा मान स्वप्नीलने मिळवला. वडिलांनी कर्ज घेतलं- 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वप्नील नेमबाजीचा सराव करतोय. पण नेमबाजीचा खेळ खार्चिक असतो. रायफल, जॅकेट यांवर खर्च करावा लागतो. एका एका बुलेटसाठीही बरेच पैसे लागतात.एक काळ असा होता की सरावासाठी बुलेट्स खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे. पण वडिलांनी कर्ज काढलं आणि मुलाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं. सराव थांबू नये, यासाठी माझ्या वडिलांनी बँकेकडून कर्ज घेतलं आणि बुलेट्स खरेदीसाठी पैसे दिले. तेव्हा एक बुलेटची किंमत 120 रुपये असायची. त्यामुळे मी नेमबाजीचा सराव करताना प्रत्येक बुलेट काळजीपूर्वक वापरायचो. कारण अधिकचा खर्च परवडणारा नव्हता. मी जेव्हा या खेळासाठी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे पुरेसं सामानही नव्हतं, असं स्वप्नीलने माध्यमांना सांगितलं होतं.