Sushma Andhare : प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र, सुषमा अंधारेंची विभक्त पतीवर प्रतिक्रिया
राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष पेटलेला असताना आता दोन गटामुळे कौटुंबिक संघर्षही पाहायला मिळतोय. या संघर्षात एका बाजुला गजानन कीर्तिकर आणि विरोधात त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर आहेत.. त्यात आता सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केलाय. . त्यामुळे सुषमा अंधारे विरुद्ध वैजनाथ वाघमारे असा संघर्ष भविष्यात पाहायला मिळू शकतो.. दुसरीकडे अनेक दिवसांपासून ठाकरे गटाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या दिपाली सय्यद यांचा शिंदे गटातील आजचा प्रवेश लांबणीवर गेलाय. सलग तिसऱ्यांदा दीपाली सय्यद वेटिंगवर आहेत. दीपाली सय्यद आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार होत्या. पक्षप्रवेश होणार नाही असं दीपाली सय्यद यांनी जाहीर केलंय
महत्त्वाच्या बातम्या


















