Sushilkumar Shinde : लेख लिहित सुशीलकुमार शिंदे म्हणाले, चुकांमुळे काँग्रेस पक्ष कमकुवत झाला
Sushilkumar Shinde : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळं काँग्रेसवर मोठी नामुष्कीची स्थिती ओढवली आहे. निर्णायक लढतीत सतत येणार्या अपयशामुळे हा पक्ष अस्तित्वहीन होताना दिसतो आहे. स्वतःची ताकद असलेल्या पंजाबसारख्या राज्यातही लाथाळ्यांमुळे काँग्रेसला सत्ता राखता आली नाही. शेतकरी आंदोलनावरून स्थानिक लोकांचा भाजपवर असलेला रोष या पक्षाला मतांमध्ये परावर्तीत करता आला नाही. एका अर्थानं सगळीकडेच नेतृत्व आणि संघटनेच्या पातळीवर काँग्रेस कमकुवत होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी दिव्य मराठी या दैनिकात एक लेख लिहला आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या स्थितीची माहिती दिली आहे. देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी दिवसेंदिवस विस्तारत असताना एका मोठ्या पक्षाचे चिन्ह होणं लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नेमकं कुठं चुकलं, काय करायला हवं आणि देशातील सध्याची एकूणच राजकीय स्थिती याविषयी सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या लेखात भाष्य केलं आहे.