Supriya Sule in Wari : बळीराजासाठी सुप्रिया सुळेंनी केली प्रार्थना
Supriya Sule in Wari : बळीराजासाठी सुप्रिया सुळेंनी केली प्रार्थना अडचणीत असलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर सडकून टीका विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय म्हणत केली टीका मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या गृह विभागाच्या कारभार बिघडला आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितलं बीड मधील तणावग्रस्त परिस्थितीवर सुप्रिया सुळे यांच वक्तव्य ,गृह विभागाच अपयश म्हणत साधला निशाणा...
हेही वाचा :
विठ्ठल भक्तांसाठी (Vitthal devotees) एक खुशखबर समोर आली आहे. मंदिर समितीच्या (Mandir Samiti) भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. मंदिर समितीने हॉटेल ताब्यात घेतले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.
विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. अतिशय भव्य स्वरुपात उभारलेल्या या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या 364 रुममध्ये जवळपास रोज 1500 भाविक निवास करु शकतात. अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या भक्त निवासामध्ये देशभरातून येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रतीचे चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.





















