Sunil Kedar Suspended : सुनील केदार यांची आमदारकी रद्द, काय आहे प्रकरण?
Sunil Kedar Suspended : सुनील केदार यांची आमदारकी रद्द, काय आहे प्रकरण?
नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी (Bank Scam) काँग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश पाठवले होते. त्यानंतर विधीमंडळाने केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेण्यात आला आहे.
2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले होते. मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते. धक्कादायक म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे.तेव्हा फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडी कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता.
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)