Sujat Ambedkar : वंचितचा 'इंडिया'मध्ये समावेश झाला नाही तर परिणाम चांगले होणार नाही
वंचितचा 'इंडिया' आघाडीत समावेश झाला नाही तर त्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे. वंचितमध्ये आंबेडकरांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी असलेले सुजात आंबेडकर सक्रिय होत आहेेेत. आतापर्यंत ते अकोल्यात फारसं लक्ष घालत नव्हते. प्रकाश आंबेडकर 2024 ची लोकसभा निवडणूक अकोल्यातून लढणारायेत. त्याच अनुषंगाने कालपासून सुजात यांनी अकोला जिल्ह्यातील बंजारा मतदारांना समोर ठेवत चार दिवसीय 'तांडे सामू चालो' म्हणजेच 'तांड्याकडे चला' ही बंजारा तांड्यांची पदयात्रा सुरु केलीय. या चारही दिवसांत त्यांचा मुक्कामही बंजारा तांड्यांवर असणारेय. याबाबत सुजात आंबेडकर यांच्याशी एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी संवाद साधलाय...





















