Sudhir Mungantiwar on Sanjay Raut : मोदी, शाह, फडणवीसांवर गंभीर आरोप, मुनगंटीवारांचा राऊतांवर पलटवार
Sudhir Mungantiwar on Sanjay Raut : आदित्य ठाकरेंना पाडण्याचा जेवढा प्रयत्न राऊतांनी केला तेवढं...
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पैशाचा अफाट वापर केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले
राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदरात शिंदेंनी अजितदादांविरोधात कारस्थाने केल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेले सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, असा आरोप राऊत यांनी रोखठोक सदरातून केला आहे.