Sudhir Mungantiwar Nagpur : चंद्रपुरात आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याने मुनगंटीवारांची नाराजी
Sudhir Mungantiwar Nagpur : चंद्रपुरात आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याने मुनगंटीवारांची नाराजी
अवघ्या चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) पराभव झालेल्या दोन बड्या नेत्यांना भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) हे दोन उमेदवार पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुनगंटीवारांना विधानसभेसाठी बल्लारपुर आणि मिहिर कोटेचा यांना मुलुंडमधून तिकीट देण्यात आलं आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवर आणि मिहिर कोटेचा यांना पराभव झाला होता. लोकसभेसाठी मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून आणि मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून रिंगणात होते. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी लढत पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत झाली होती. लोकसभेचा निकाल लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार 406 मतांनी पराभव झाला होता. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघातून मुनगंटीवार आमदार राहिले आहेत, त्याच बल्लारपूर मतदारसंघात प्रतिभा धानोरकरांना मताधिक्य मिळालं होतं. आता पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात होते. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये मिहीर कोटेचा यांना एकूण 4 लाख 21 हजार 076 मत मिळाली, तर संजय दिना पाटील यांना एकूण 4 लाख 50 हजार 937 मत मिळाली.