Suchita Deshpande लिखीत पुस्तक ‘काळोखातील प्रकाशरेषा’ न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीत विराजमान
पत्रकार सुचिता देशपांडे लिखित ‘काळोखातील प्रकाशरेषा’ हे पुस्तक अमेरिकेतल्या न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीत आणि न्यू जर्सीच्या ‘दि ज्युईश हेरिटेज म्युझियम ऑफ मॉनमाऊथ काऊंटी’ या वस्तुसंग्रहालयाच्या ग्रंथालयात विराजमान झालं आहे. त्या निमित्तानं एक मराठी पुस्तक आंतरराष्ट्रीय ग्रंथालयांमध्ये दाखल झालं आहे. पेशानं शिक्षक असलेल्या फ्रीडल डिकर ब्रॅण्डाइस यांनी छळछावणीतल्या शेकडो मुलांना कलाशिक्षणाद्वारे कसं जगण्याचं बळ पुरवलं, याची चित्तथरारक कथा सुचिता देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘काळोखातील प्रकाशरेषा’ या पुस्तकात उलगडत जाते. या पुस्तकाकरता त्यांनी लहानग्या मुलांनी काढलेली चित्रे प्रागच्या ज्युईश म्युझियमकडून मिळवली आहेत. या पुस्तकाला मुंबईतील इस्रायल दूतावासाचे विशेष साह्य लाभलं आहे.























