ST Strike : मुंबई, नागपूर, वाशिम डेपोत एसटीला ब्रेक, प्रवाशांचे हाल
ST Strike : मुंबई, नागपूर, वाशिम डेपोत एसटीला ब्रेक, प्रवाशांचे हाल
एसटी कामगारांनी पुकारला संप... अकोला आगारातून एकही बस सुटली नाहीए.. राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व इतर महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण. वास्तविक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा महागाई भत्ताप्रमाणे देण्यात यावा, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ परिवहन कामगारांना नियमानुसार लागू करण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे.. परंतु सदर माागण्यांची पुर्तता करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून त्याची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाकडून कामगार कराराच्या तरतुदीचा भंग होत असल्याने आज सकाळी 6 वाजल्या पासून बंद पुकारण्यात आला.. पहाटेपासून अकोला आगारामधून एकही बस निघाली नाही.... अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर आज सकाळी सहा वाजता पासूनच इथल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे... विविध मागण्यांसाठी हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे..