SRK VS Jayant Patil : जेव्हा शाहरुख खानला जयंत पाटील यांनी भर रस्त्यात झापलं : ABP Majha
2017 ची गोष्ट आहे. शाहरुखचा अलिबागमध्ये एक मोठा बांगला आहे. दिवाळी दरम्यान आपली बिर्थडे पार्टी उरकून तो आपल्या यॉच ने तोच मुंबईला रवाना झाला परंतु गेटवे ऑफ इंडियाला पोहोचूनही तो त्याच्या बोटीतून उतरला नाही. तो आत बसून मजेत सिगारेटचे झुरके घेत होता..इतकी मोठी व्यक्तीअसल्या करणाने तेथील व्यवस्थापन सुद्धा त्याला काहीच म्हणाले नाही आणि पर्यटकांना मात्र बाहेरच थांवबून ठेवलं...तो दिवाळीचा काळ होता आणि अनेक पर्यटक फिरण्यासाठी अलिबागला जात होते...हळूहळू बाहेर गर्दी वाढली..शाहरुखचे फॅन्स ही तिथे पोहोचले. पण इतक्यात सफेद शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला माणूस तिथे आला आणि शाहरुख खानला त्याच्या बेजबाबदारपणाबद्दल खरी खोटी सुनावली... ही व्यक्ती होती शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील...



















