Special Report Pune Rain : पुण्यात जोरदार पाऊस, नागरी भागात पाणी शिरले ABPMajha
Special Report Pune Rain : पुण्यात जोरदार पाऊस, नागरी भागात पाणी शिरले ABPMajha
हे देखील वाचा
Pune Heavy Rain: पुण्यात पुन्हा पूरस्थिती; खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा, अजित पवारांच्या सूचना
Pune Rain Update : पुण्यात धरण परिसरात (Pune Rain News) तुफान पाऊस सुरू आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.दरम्यान पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झालीय. सोसायटी मधील नागरिकांना बाहेर काढण्यात येतंय. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे तसेच निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरण भरू लागली आहेत. धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहे. धरणात 65 टक्केपर्यंत पाणी सोडावे असे अजित पवारांनी सांगितले. तसेच पाणी सोडताना नागरिकांना सूचित करावं असे देखील अजित पवारांनी सांगितले आहे. खडकवासला धरण हे 65 टक्केपर्यंत खाली केलं तर रात्री पाऊस पडला तर धरणात पाणी राहील असे अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत.