Shivendra Raje vs Shashikant Shinde | शिवेद्रराजे-शशिकांत शिंदेंमधला वाद का पेटला? Special Report
सातारा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि कोरेगाव मतदार संघाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात सध्या चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना दम देत म्हटलं की, "माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हातात घेतल्यानंतर साताऱ्यातील राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी सध्या आमदार शशिकांत शिंदे चांगलेच अग्रेसर असल्याचे अनेक ठिकाणच्या राजकीय घडामोडीतून दिसत आहे. यातूनही शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदेंच्या पिचवर म्हणजे त्यांच्या मूळ गावातील जावली भागावर चांगलीच पकड केल्याचे दिसत आहे.
शशिकांत शिंदे हे कायमच शिवेंद्रराजेंबद्दल खाजगीत बोलत असतात. विधानसभा निवडणूकीत मी पडण्यामध्ये मोठा हात हा शिवेंद्रराजेंचा आहे, म्हणूनच मी माझ्या पिचवर म्हणजे जावली खोऱ्यात त्यांना त्रास देणार. याच कारणातून आता शिवेंद्रराजे भोसले यांनी जावली येथील कुडाळ येथे झालेल्या छोट्या कार्यक्रमात शशिकांत शिंदेंना जाहीर आव्हान देत माझी वाट लागली तरी चालले पण मी त्यांची ही वाट लावणार, असा सज्जड दमच दिला. शशिकांत शिंदेना त्यांच्या पिचवर जाऊन दिलेला दम हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.