Solapur विद्यमान उपमहापौर तडीपार! द्वेषापोटी कारवाई केल्याची राजेश काळेंची टीका ABP Majha
सोलापूर : सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे (Solapur Deputy Mayor Rajesh Kale) तडीपार करण्यात आलं आहे. पुढील दोन वर्षांसाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातून तसेच इंदापूर तालुक्यातून त्यांना तडीपार करण्यात आलं आहे. राजेश काळे हे भाजपचे नगरसेवक तथा सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत. शिवीगाळ, फसवणूक अशा विविध पद्धतीचे आरोप काळे यांच्यावर आहेत. स्वतः राजेश काळे यांच्याकडून तडीपारीचे आदेश प्राप्त झाल्याच्या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे. निवडणुका तोंडावर असताना राजकीय द्वेषापोटी कारवाई झाल्याची टीका काळे यांनी केली आहे. तडीपारीच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे. ते स्वतः सोलापूर सोडून निघाले आहेत, अशीही माहिती आहे.

















