एक्स्प्लोर
Leopard Attack: 'बिबट्या दिसताच गोळ्या घाला!', Pune जिल्ह्यातील Shirur मध्ये वनविभागाचे आदेश
पुण्याच्या (Pune) शिरूर (Shirur) तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने (Forest Department) नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. 'बिबट्याला "नरभक्षक" (man-eater) घोषित केले असून, दिसताच ठार मारण्याचे (shoot-at-sight) आदेश जारी केले आहेत,' अशी माहिती महाराष्ट्र वनविभागाने दिली. गेल्या काही दिवसांत या बिबट्याने दोन मुलांसह तीन जणांचा बळी घेतला आहे. मृतांमध्ये १३ वर्षीय रोहन विलास बोंबे, साडेपाच वर्षांची शिवन्या शैलेश बोंबे आणि एका ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. या घटनांनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी जोरदार निदर्शने करत वनविभागाचे वाहनही पेटवून दिले. वाढता धोका लक्षात घेता, वनविभागाने परिसरात पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप लावले असून, शार्प शूटर्सच्या टीमला पाचारण केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















