Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळताना सर्वात आधी कोणी पाहिला?
Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळताना सर्वात आधी कोणी पाहिला?
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळताना स्थानिक मच्छीमारांनी पहिला. घटनास्थळी दाखल होत छन्नछिन अवस्थेत कोसळलेला महाराजांचा पुतळा पाहून त्यांनी स्वतःच्या मच्छीमारीसाठी आणलेल्या ताडपत्रीने झाकून ठेवलं. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी वाऱ्याचा वेग मोठा नव्हता. मात्र पुतळा बनवताना वापरण्यात आलेले धातूच गंजून ही घटना घडली. या मुद्याच राजकरण न करता त्या ठिकाणी दुसरा पुतळा उभारला जावा. मात्र त्या ठिकाणी सर्व गोष्टींचा अभ्यास करून स्मारक उभारण्यात यावं. रोज डोळ्यादेखत दिसणारं महाराजांचं स्मारक आता पाहता येत नसल्याने मच्छीमारांनी दुःख व्यक्त केलं.






















