एक्स्प्लोर
Mission Mumbai: 'नाराज नेत्यांना नवी पदं, हजारो नियुक्त्या'; मुंबई जिंकण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार फिल्डिंग
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी माजी विभागप्रमुखांना विभाग समन्वयक आणि शाखा समन्वयक अशी नवी पदे देऊन त्यांची मनधरणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत सुमारे अडीच ते तीन हजार नियुक्त्या करण्यात आल्या असून, २७७ प्रभागांमध्ये सुमारे ८० टक्के गटप्रमुखांच्या नेमणुका पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक प्रभागात ५० हून अधिक लोकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचेही कळते. यासोबतच, पक्षाच्या 'लक्षवेध' ॲपच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदारांची आणि मतदार याद्यांची पडताळणी केली जात आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















