एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Shilpa Shetty, Raj Kundra : भारताबाहेर जायचंय? 'आधी 60 कोटी द्या' Special Report
अभिनेत्री Shilpa Shetty आणि Raj Kundra यांच्या आयुष्यातील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. Mumbai High Court ने त्यांना परदेश प्रवासाची परवानगी नाकारली आहे. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात Court ने दोघांनाही फटकारले आहे. 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर Lookout Notice जारी आहे. ही नोटीस रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी Court मध्ये धाव घेतली होती. मात्र, Court ने त्यांना "आधी फसवणूक प्रकरणातले साठ कोटी रुपये भरा आणि मग परदेशात कुठेही जा" असे स्पष्टपणे सांगितले. Shilpa Shetty आणि Raj Kundra यांना 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान Sri Lanka मधील Colombo येथे एका कार्यक्रमासाठी जायचे होते. उद्योजक Deepak Kothari यांनी त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. Kothari यांनी 2015 ते 2023 या कालावधीत Best Deal Private Limited या कंपनीत 60 कोटी रुपये गुंतवले होते. ही कंपनी सध्या बंद आहे. Kothari यांचा दावा आहे की या दाम्पत्याने हे पैसे स्वतःच्या खर्चासाठी वापरले, तर Shilpa Shetty यांनी सप्टेंबर 2016 मध्येच कंपनीचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सध्या तरी त्यांच्या परदेश प्रवासाची शक्यता धूसर दिसत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















