Navratri 2021 : नवरात्रातील नऊ दिवसांच्या रंगांमागचं पारंपरिक महत्त्व, यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग?
Shardiya Navratri 2021 Nine Color: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरु होतो. नवरात्रोत्सवामध्ये रंगाचे महत्व असते. दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पाहूयात यावर्षीचे रंग कोणते आहेत.
पहिला दिवस: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळा रंग हा ज्ञान, विद्या, सुख, शांती, अध्ययन, विद्वता, योग्यता, एकाग्रता, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतिक आहे. हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो.
दुसरा दिवस: नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रम्हचारिणी देवीला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग विश्वास, उर्वरता, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक आहे. हा रंग अनेक आजार दूर करू शकतो, असे मानले जाते.
तिसरा दिवस: तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीच्या या रूपाला तपकिरी रंग आवडतो. तपकिरी रंग हा मेहनत आणि चिकाटीचे प्रतिक आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तपकिरी रंगाचा पोषाख परिधान करून चंद्रघंटा देवीची पूजा करावी.
चौथा दिवस: चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला नारंगी रंग आवडतो. नारंगी रंग हा गौरव आणि वीरतेचे प्रतिक आहे. असे मानले जातेस की, जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पुजा केली तर देवी प्रसन्न होते.
पाचवा दिवस: पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला पांढरा रंग आवडतो. पांढरा रंग हा पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक आहे. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्कंदमाताची पूजा करावी.
सातवा दिवस: सातव्या दिवशी कालरत्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे.
आठवा दिवस: आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक आहे.
नऊवा दिवस: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नऊव्या सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. सिद्धीदात्री देवीला जांभळा रंग आवडतो. जांभळा रंग हा उत्साह, वैभव आणि एकमेकांमधील प्रेमाचे प्रतिक आहे. हा रंग मनाला शांती देतो.