Sharad Pawar on Ajit Pawar : सुप्रिया आणि अजितमध्ये कधीच भेद केला नाही, पवार पहिल्यांदाच बोलले
Sharad Pawar on Ajit Pawar : सुप्रिया आणि अजितमध्ये कधीच भेद केला नाही, पवार पहिल्यांदाच बोलले
अजित पवार नवखे होते म्हणून २००४ मध्ये त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं नाही, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अजितदादांना खडे बोल सुनावलेत.
अजित पवारांना सगळं काही देऊनही पक्षात काम करायला मिळालं नाही, ही त्यांची ओरड निरर्थक असल्याचं पवार म्हणाले. भुजबळ किंवा इतरांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता असंही पवार म्हणालेत.
कुटुंबप्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात कधीही भेद केला नाही. अजित पवारांना पक्षाने काय कमी दिले ? उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदे दिली. सुप्रिया सुळे या चार वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होते. विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे साऱ्या राज्याची सूत्रे होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे, असे पवारांनी सुनावले.