Sharad Pawar On Maharashtra Vidhansabha : महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचंय, शरद पवार काय बोलले?
Sharad Pawar On Maharashtra Vidhansabha : लोकसभेतल्या कामगिरीची अंतःकरणात नोदं, आम्हाला महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचंय
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने माविआला प्रचंड प्रतिसाद दिला 31 जागा निवडणून दिल्या.. जनतेचा आभारी आहे माविआच्या वतीने सगळ्या जागा लढतोय.. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करायचं आहे माविआच्या वतीने महाराष्ट्रत जनतेच्या हिताची जपणूक करण्यासाठी आघाडी काम करेल एक उच्च शिक्षित पदवीधर असा उमेदवार दिला आहे.. माझी खात्री आहे नव्या नेत्रृत्वाचा स्विकार करुन निवडणून देतील..
हे ही वाचा...
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी बारामती (Baramati Constituency) या मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी खासदार शरद पवार उपस्थित होते. बारामतीच्या निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. सोबतच त्यांनी बारामतीची जनता युगेंद्र पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. यासह त्यांनी युगेंद्र पवार यांना दोन महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. त्यांच्या या सल्ल्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
बारामतीची जनता आज नव्या पिढीतील नव्या नेतृत्त्वाचा...
यांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. युगेंद्र पवार यांचं शिक्षण परदेशात झालं. ते एक उच्चशिक्षित पदवीधर आहेत. त्यांचं प्रशासन, व्यावसाय, साखरधंदात यात ते जाणकार आहे. अशा तरुणाला पक्षाने आज संधी दिली. बारामतीची जनता आज नव्या पिढीतील नव्या नेतृत्त्वाचा स्वीकार करेल. तसेच त्याच्या पाठीशी आपली शक्ती उभी करेल, याची मला खात्री आहे, अशा भावनाही शरद पवार यांनी व्यक्त केल्या.