Sharad Pawar On Ajit Pawar : दोन-तीन दिवसात नेमकं चित्र स्पष्ट होईल, काही सहकारी आपल्या संपर्कात!
राज्याच्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आल्यावर शरद पवार काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. त्यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या प्रकाराला आपला अधिकृत पाठिंबा नाही, हेच स्पष्ट केलं. पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच राहील. आपल्या काही सहकाऱ्यांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली, मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मी नियुक्त केलं होतं, त्यांनी घेतलेली भूमिका योग्य नाही. पक्षातल्या इतर नेत्यांसह चर्चा करुन या दोघांवर कारवाई होईल,असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. दोन-तीन दिवसात नेमकं चित्र स्पष्ट होईल. काही सहकारी आपल्या संपर्कात आहेत, असाही दावा शरद पवारांनी केला. आपण कोेर्टात नाही तर जनतेत जाणार आहोत. तसंच उद्या आपण कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करणार असल्याचंही पवारांनी यावेळी सांगितलं.



















