Shambhuraj Desai Mumbai : राऊत..अंधारे ते धंगेकर! शंभुराजे देसाई यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
Shambhuraj Desai Mumbai : राऊत..अंधारे ते धंगेकर! शंभुराजे देसाई यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
शंभुराज देसाई पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
"विधानसभा सदस्य पुणे रविंद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे येथे शासकिय कार्यालयात जाऊन जाब विचारला.
पुण्यात घडलेल्या घटनेनंतर पोलिस उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. मात्र आंदोलन करताना खोक्यावर व हातात पैसे घेऊन आंदोलन केले.
रवींद्र धांगेकार आणि सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते. ललित पाटील प्रकरणात माझं नाव सुषमा अंधारे यांनी घेतलं होतं. त्याचवेळी मी स्पष्ट केलं होतं की अंधारे यांनी वक्तव्य मागें घ्यावं. त्यांनी ते मागें घेतलं नाही. सध्या पाटण कोर्टात तारीख पडत आहे. न्यायालय सुट्टी संपली की मी कोर्टाला विनंती करणार आहे की लवकर ललित पाटील प्रकरणी तारीख द्यावी आणि माझी बाजू ऐकुन घ्यावी."