Satara District Bank Election : Udayan Raje आणि Shivendra Raje यांच्यामधील संघर्ष तूर्तास टळला
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उपुमख्यमंत्री अजित पवार आणि बँकेचे मार्गदर्शक, ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर यांची मध्यस्थी फळाला आली. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमधला संघर्ष तूर्तास टळलाय. त्यामुळे प्रमुख नेत्यांनी समन्वयाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात रामराजे, उदयनराजे, शिवेंद्रराजेंसह ११ संचालक बिनविरोध निवडून आले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह सत्ताधारी पॅनेलच्या दहा जणांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. खासदार उदयनराजे भोसले यांना सत्ताधारी पॅनेलमध्ये घ्यावे असा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आग्रह केल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतल्याने उदयनराजेंचा सत्ताधारी पॅनेलमध्ये प्रवेश झाला. काल अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बँकेचे आणि मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे, खासदार उदयनराजे, आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील, दत्ता नाना ढमाळ, अनिल देसाई, शिवरूप राजे खर्डेकर आदी ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या चर्चेनंतर अखेर उदयनराजे भोसले यांना सर्व पक्षीय सत्ताधारी पॅनलमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक सोपी झाली.