Satara District Bank Election : गाफील ठेवल्यानं पराभव; Shashikant Shinde meet Sharad Pawar
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम झाला... आणि या पराभवावर मंथन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यात दाखल झाले. काल साताऱ्यातील सर्कीट हाऊसमध्ये शरद पवार, शशिकांत शिंदे आणि जिल्ह्यातील राष्ट्रावादीच्या इतर नेत्यांमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या निकालावर खलबतं झाली.. गाफील ठेेवण्यात आल्यानं पराभव झाल्याची भावना शशिकांत शिंदेंनी या बैठकीनंतर बोलून दाखवलीय. तर दुसरीकडे शशिकांत शिंदेंना एका मतानं पराभूत करणाऱ्या ज्ञानदेव रांजणेंनी, पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि आता भाजपचे आमदार असलेल्या शिवेंद्रराजेंसोबत ठेका धरला होता.. विधानसभा, लोकसभा निवडणुकीपेक्षाही चुरशीच्या ठरलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.




















