Satara Accident : तो प्रवास अखेरचा ठरला; हिरकरणी ग्रुपच्या शुभांगी पवार यांचा मृत्यू ABP Majha
साताऱ्याच्या हिरकरणी ग्रुपच्या नऊ महिला १० ऑक्टोबर रोजी साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन घेण्यासाठी निघाल्या... बाईक राईडिंग करत या महिला साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन घेणार होत्या.... या ग्रुपमधील शुभांगी पवार यांचं आज नांदेड जिल्ह्यात अपघाती निधन झालंय... नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या महिलांकडून हा उपक्रम राबवत होत्या... भाजप खासदार उदयनराजे यांनी स्वतः या महिलांना फ्लॅग ऑन केला होता... नांदेडमध्ये माहूर गडावरील रेणुकामाता देवीच्या दर्शनासाठी या सगळ्या महिला बाईकवरुन निघाल्या होत्या, दरम्यान भोकर फाटा दाभड येथे एका टँकरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.... अपघात इतका भयानक होता की या अपघातानंतर काही महिलांना भुरळही आली...





















