Sanjay Raut Full PC :नाकाने कांदे सोलणारे,तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय?राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Kundmala bridge collapse : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची (Kundmala bridge collapse) दुर्दैवी घटना घडली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी अद्यापपर्यंत 51 जणांचे प्राण वाचवले आहेत. दरम्यान, काही नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, काल मावळमध्ये पूल कोसळला पूल कोसलला आणि किमान 50 लोक वाहून गेले. माझा प्रश्न अजित पवारांना आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. अनेक वर्षांपासून आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकारही आहे. मी आणि पुणे जिल्हा कोणीही वेगळं करू शकत नाही. मग कालच्या दुर्घटनेची अजित दादा पवार पालकमंत्री म्हणून जबाबदारी आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात. तेथील आमदार सुनिल शेळके यांना अजित दादा घेऊन फिरतात. त्यांच्या निवडणूकीत मोठा खर्च त्यांनी केला. एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षांमध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान कामांमध्ये झोपलेले असतात आणि मोठ्या बिल्डरांचे काम, मेट्रोचे काम, मोठ्या ठेकेदारांची कामे यात पालकमंत्री जागे असतात, असा हल्लबोल त्यांनी यावेळी केला.






















