एक्स्प्लोर
Sanjay Raut on Eknath Shinde | शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण काय? राऊतांचा घणाघात
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'दिल्लीत गुरु अमित शाह (Amit Shah) यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले', अशी बोचरी टीका शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. शिंदे शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीला रवाना झाल्याने त्यांच्या या दौऱ्यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत अस्पष्टता आहे. शिंदे गटाने शिवसेनेचे पक्षचिन्ह आणि नावावर हक्क सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, शिंदे हे केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशी शंकाही राऊत यांनी उपस्थित केली आहे. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांमुळे केवळ विरोधकांनाच अस्वस्थता येते, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. या दौऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















