Sanjay Raut : केंद्राने आरक्षणाच्या विषयात लक्ष घालावं -संजय राऊत
Sanjay Raut : केंद्राने आरक्षणाच्या विषयात लक्ष घालावं -संजय राऊत
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा (Marathi Classical Language) मिळाला त्याचा आनंद आहे. मराठी भाषेचा सन्मान वाढला आहे. गेल्या 15 -20 वर्षात शिवसेनेसह मराठी खासदारांनीही याचा पाठपुरवठा केला. भाषेला प्रतिष्ठा मिळाली आता माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. एमआयएमच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले, आघाडीत आधीच भरपूर पक्ष झालेत, नव्या पक्षाला 288 जागा देणं शिवसेनेला कठीण दिसतंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, मराठी माणसाला भाषेला प्रतिष्ठा मिळाली पण मराठी माणसाला प्रतिष्ठा देण्याचा काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. ज्याप्रमाणे मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली सरकारी पातळीवर त्याच पद्धतीने माझं केंद्र सरकारला आवाहान आहे की, मराठी माणसाचा रोजगार जो अन्य राज्यात पळवून नेत आहे तो कृपा करून थांबवा. मराठी भाषेबरोबर मराठी माणसाचा हक्काचा रोजगार सुद्धा त्याला आपला महाराष्ट्रात मिळू द्या. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 55 वर्षापूर्वी आंदोलन उभा केला होता. भाषेला प्रतिष्ठा मिळाली माणसांना प्रतिष्ठान मिळाली पाहिजे. जिथे मराठी बोलली जाते त्या महाराष्ट्राची लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणे हे गंभीर आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे ती गद्दारी, बेईमानी पाहता या राज्यातील फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही पण नक्कीच आम्ही आज आनंदी आहे.